Home प्रादेशिक बातमी ऊसतोड कामगारांची नोंदणी तातडीने आणि अचूकपणे पूर्ण करावी

ऊसतोड कामगारांची नोंदणी तातडीने आणि अचूकपणे पूर्ण करावी

0
2
sugarcane cutting workers yojna

beed,

sugarcane cutting workers yojna राज्यातील ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी आणि त्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या ओळखपत्र वितरण प्रक्रियेला आता गती देणे गरजेचे आहे. तरी जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची नोंदणी तातडीने आणि अचूकपणे पूर्ण करावी, असे कडक निर्देश महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करून त्यांना ओळखपत्र वितरीत करणेबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, समाज कल्याण सहायक आयुक्त प्रदीप भोगले यांची प्रमुख तर सर्व तहसीलदार व गट विकास अधिकारी यांची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन उपस्थिती होती. दीपा मुधोळ-मुंडे म्हणाल्या की, ऊसतोड कामगारांचे जीवन सुरक्षित आणि स्थिर करण्यासाठी ही नोंदणी अत्यंत महत्त्वाची आहे.

यात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून हे काम मिशन मोडवर पूर्ण करावे. ऊसतोड कामगारांना अधिकृत ओळखपत्र देण्यासाठी प्रशासनाने गावपातळीवर एका विशेष समितीची स्थापना करण्यात येत आहे. यामध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविका यांचा समावेश आहे.

ही समिती गावातील सर्व ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करून त्यांची अचूक यादी तयार करेल. तयार केलेली यादी मंजुरीसाठी सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केली जाईल. सहाय्यक गट विकास अधिकारी या यादीची पडताळणी करून ओळखपत्र तयार करण्यासाठी अंतिम मंजुरी देतील.
महाराष्ट्र राज्यासाठी स्मार्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या नामांकित संस्थेकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने डेटा संकलित केला जाईल, जेणेकरून एकही पात्र ऊसतोड कामगार नोंदणीपासून वंचित राहणार नाही. असेही त्यांनी सांगितले.

_बीड जिल्हयात ऊसतोड कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ, पुणे या महामंडळाच्या योजनांचा जिल्ह्यातील सर्व पात्र कुटुंबांना लाभ व्हावा यासाठी संबंधितांकडे ओळखपत्र उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. तरी ऊसतोड कामगारांचे सर्व्हेक्षण व त्यांची नोंदणी करुन त्यांना ओळखपत्र उपलब्ध करुन देण्याचे कामकाज युद्धपातळीवर पुर्ण करणे आवश्यक आहे. अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित संस्था स्मार्ट सर्व्हिसेस. प्रा. लि.पुणे यांच्याशी समन्वय साधून सदरचे कामकाज दि.१५ ऑगस्ट, २०२६ पर्यंत पुर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गावपातळीवरील सर्व समितीमधील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, आशा व अंगणवाडी सेविका यांची तातडीने बैठक घ्यावी. क्षेत्रीय स्तरावर काम करताना येणाऱ्या अडचणी दूर करून त्वरित प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी यावेळी दिले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here