Homeप्रादेशिक बातमीऊन्हाची तिव्रता व पाण्याची टंचाई लक्षात घेता राज्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात...

ऊन्हाची तिव्रता व पाण्याची टंचाई लक्षात घेता राज्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात -मराठवाडा शिक्षक संघाचे निवेदन!

बीड,22 जुन

Alnino school timetable effect शैक्षणिक सत्र 20226-2027 मधील नियमित शाळा दि.१५ जून रोजी सुरू झाल्या आहेत. अलनिनोच्या प्रभावामुळे अद्याप पावसास सुरवात झालेली नाही.उन्हाची तीव्रता व पाण्याची टंचाई मुळे बीड जिल्ह्य़ातील सर्व माध्यमांच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाने केली आहे.


मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सचिव गणेश आजबे यांनी याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, अलनिनोच्या प्रभावाने महाराष्ट्रात अद्याप पाऊस झाला नाही.

काही भागात थोड्या प्रमाणात पाऊस झाला व नंतर पावसाने मोठी उघडीप दिल्यामुळे संपूर्ण राज्यभर उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे.उन्हाची तिव्रता व भीषण पाणी टंचाईला जनता तोंड देत आहे. शाळेतील कुपनलिकांचे पाणी आटले आहे.

शालेय पोषण शिजवण्यासाठी पाणी मिळत नाही. म्हणून चांगला पाऊस पडेपर्यंत राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम, जिल्हाध्यक्ष कालिदास धपाटे, जिल्हा सचिव गणेश आजबे, तालुकाध्यक्ष युवराज मुरूमकर, तालुका सचिव विनोद सवासे यांनी राज्य शासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments