Homeप्रादेशिक बातमीबीड जिल्ह्यातील शाळा 23 जून पासून सकाळच्या सत्रात भरणार

बीड जिल्ह्यातील शाळा 23 जून पासून सकाळच्या सत्रात भरणार

school alnino time changes अलिनोच्या प्रभावामुळे वाढलेले तापमान आणि उष्माघाताचा धोका लक्षात घेता शाळांचे नियमित कामकाज सकाळच्या सत्रात घेण्यासंदर्भातला निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून याबाबतचे पत्र आज काढण्यात आले.

दिनांक 23 जून पासून पुढील आदेश येईपर्यंत या शाळा सकाळी आठ ते दुपारी साडेबारापर्यंत भरवण्यात येणार आहे.


याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक यांनी आदेश काढला असून सर्व गटशिक्षणाधिकारी यांना हा आदेश पाठवण्यात आला आहे. बीड जिल्ह्यामध्ये दरवर्षी कमी पाऊस होतो. त्यातच अननिलो च्या प्रभावामुळे व लांबलेल्या पावसामुळे वातावरणातील बदल अधिक तीव्र झाले असल्यामुळे जिल्ह्यात तापमानात वाढ झालेली आहे. याचा विद्यार्थ्यांमध्ये उष्माघात निर्जलीकरण व उष्णतेच्या संदर्भातील समस्या निर्माण होऊ शकतात. त्या अनुषंगाने तूर्तास जिल्हा परिषद च्या शाळा दिनांक 23 जून 2026 पासून पुढील आदेश येईपर्यंत सकाळच्या सत्रात म्हणजेच सकाळी आठ ते साडेबारापर्यंत भरवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर सेना, प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांनी जिल्हा परिषदेला या संदर्भात निर्णय घेण्याचे निवेदन दिले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments