Tuesday, March 25, 2025

धनगर समाजाला पदाधिकारी म्हणून संधी दिली -सुरेश धस

आष्टी (प्रतिनिधी)-

Ashti assembly elections bjp Suresh Dhas धनगर समाज हा अत्यंत प्रामाणिक आणि कष्टकरी समाज असून माझ्या राजकीय जीवनातील सुरुवातीपासूनच मी अनेक व्यक्तींना अनेक पदांवर पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी दिली आहे हे सर्व नावे मी सांगतो विरोधी उमेदवारांनी अशा प्रकारचे नावे सांगावीत असे आव्हान माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी दिले.


धनगर समाज बांधवांच्या बैठकीमध्ये ते बोलत होते.


यावेळी व्यासपीठावर भाजपा ओबीसी राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.खा. चंदुलालजी साहु साहेब,प्रदेश सचिव नवनाथ पडळकर,देविदास धस,उपाध्यक्ष किसान मोर्चा नवनाथ शिंदे,राजाभाऊ गावडे,भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस मा.अभिजित शेडगे, अशोक ढवण,ह.भ.प. सुरेश महाराज कोळेकर,ह.भ.प. नारायण भोंडवे, जिल्हाप्रमुख भिमराव माळशिखरे,रामहरी महारनोर,यशवंत सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश सोनसळे,दादा हरिदास, हनुमंत काळे, मुकेश काळे, रामदास शेंडगे,नारायण भोंडवे,रामकिसन भोंडवे,सुरेश काळे,भाऊसाहेब राऊत आदी उपस्थित होते.


धस पुढे बोलताना म्हणाले,माझ्या विरोधात जे तीन उमेदवार आहेत.त्यांना माझे एकच म्हणणे आहे की,तुम्ही पण असा मेळावा घ्या तुम्ही सगळेच तिथे जा मी ज्याप्रमाणे समाजातील व्यक्तिंना विविध ठिकाणी पदाधिकारी पदावर बसवले ती नावे सांगतो त्याप्रमाणे तुम्ही देखील नावे सांगावीत.या मेळाव्यातील उपस्थित सगळ्यांना नावासहित ओळखू शकतो.त्यांनी मंडपातील दहा टक्के उपस्थितांची जर त्यांनी नावे सांगितली तरी त्यांना मतदान देऊन टाका मला मान्य राहील…असे सांगत माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी विरोधी उमेदवाराला आव्हान देऊन म्हणाले की,अरे तुम्ही काय गप्पा मारता ?

निवडणूक आयोगाने दिलेली तुमची निशाणी ते वाजवायच्या ऐवजी दुसऱ्याची निशाणी फुका म्हणता…मी माझ्या आजवरच्या राजकीय कारकीर्दीमध्ये धनगर समाजाला अनेक पदावर बसवून न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे करणाऱ्याला का निवडणूक आयोगाने दिलेले स्वतःच जे चिन्ह विसरणारला तुम्ही मदत करणार का? असा सवाल करून पुढे बोलताना ते म्हणाले की कधीही कोणाचीच जात पात पाहून मी कधीच काम केलंल नाही असा मी कार्यकर्ता आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून केलेल्या सुरनारवाडी,भोजेवाडी,बुर्हेवाडी,सुलेमान देवळा,दादेगाव,शेंडगेवाडी मी आमदार असताना अनेक रस्ते कामे केली आहेत. अनेक अडचणीच्या काळात मी मतदाराला आलेला आहे त्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला मला तुम्ही साथ समर्थन द्या पुढील पाच वर्षे काम करण्याची संधी द्या.


यावेळी अध्यक्षीय समोरोप करताना राष्ट्रीय उपाध्यक्ष साहू म्हणाले, जो राष्ट्र हिताच्या व्यापक विचार करणारे आणि मोदीजींच्या विकासावर विश्वास ठेवीन असा या मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून लोकप्रतिनिधी मधून म्हणून सुरेश धस यांना आपण विजयी करावे असे यावेळी बोलताना त्यांनी आवाहन केले.तर शृंगार ऋषी गडाचे महंत सुरेश महाराज कोळेकर म्हणाले की, मी सुरेश धस यांना आशीर्वाद देऊन विजयाची खात्री चा संकल्प या मेळाव्यानिमित्त करतो आपण सर्वांनी सुरेश धस साथ द्यावी.


भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अभिजित शेडगे यावेळी बोलताना म्हणाले,धनगर समाजाचे प्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना जिल्हा परिषद अध्यक्ष असो, जिल्हा परिषद सदस्य असो सरपंच, सेवा सोसायटी चेअरमन ,अशा अनेक पदावर काम करण्याची संधी सुरेश धस यांनी अनेक धनगर समाजाला दिली असून त्यांना सहकार्य करा,यावेळी सकल धनगर समाजाच्या मेळाव्यास आष्टी,पाटोदा, शिरूर तालुक्यातील पदाधिकारी ,सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles