Home जिल्हा बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार,ना. धनंजय मुंडे, आ. पंकजाताई मुंडे व पोपटराव पवार यांच्या...

उपमुख्यमंत्री अजित पवार,ना. धनंजय मुंडे, आ. पंकजाताई मुंडे व पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत आज दुसऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन 

0
17
आष्टी कृषी प्रदर्शन

आष्टी  (वार्ताहर):-

आष्टी कृषी प्रदर्शन : आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे लोकनेते माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून  साकारलेले मराठवाड्यातील सर्वात मोठे डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय दुसरे कृषी प्रदर्शनाचे उदघाटन आज आष्टी येथे  होणार आहे. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, कृषी मंत्री व पालकमंत्री धनंजय मुंडे, भाजपाच्या नेत्या आ. पंकजाताई मुंडे, आदर्श सरपंच पोपटराव पवार, परभणी कृषी  विद्यापिठाचे  कुलगुरु डॉ. इंद्र मनी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

           याबाबत अधिक माहिती अशी की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत आनंद चॅरिटेबल संस्था आष्टी संचलित श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषि महाविद्यालय यांच्या वतीने व शेतकऱ्यांचे नेते माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२४ या कालावधीत मराठवाड्यातील सर्वात मोठे डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन आज होत आहे. गतवर्षी हे प्रदर्शन उशिरा झाले होते. परंतु यावेळी शेतकऱ्यांना रब्बी हंगामात काय पिके घेता येतील, त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन प्रदर्शनातून मिळणार आहे. दिड लाखावर  शेतकरी  कृषी प्रदर्शनाचा लाभ घेतील असा अंदाज  आहे.

कृषी प्रदर्शानाच्या निमित्ताने सांगली येथील व देशातील सर्वात उंच  ४१ लाख रुपये किमंतीचा खिलार कोसा जातीचा सोन्या बैल प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने चार दिवस दररोज दुपारी १२ ते २  या वेळेत कृषी संबंधित तज्ञांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे. कृषी प्रदर्शनासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या नावांमधून दर तासाला लकी ड्रॉ काढण्यात येईल व लकी शेतकऱ्यांला शेती उपयोगी भेट वस्तू देण्यात येईल. शेवटच्या दिवशी बंपर लकी ड्रॉ काढुन विजेत्याला  बक्षीस दिले जाईल. कृषी प्रदर्शनात जिरेनियम शेती, खेकडा पालन, गोमातेच्या शेणापासून विविध वस्तू कशा निर्माण करायच्या यांची माहिती मिळणार आहे. महिलांनी घरबसल्या घरगुती व्यवसाय करणे, विविध प्रकारचे ट्रॅक्टर व अवजारे, दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे अत्याधुनिक मशिन, कुक्कुटपालन माहिती तसेच बॅंके मधून लोन कसे काढायचे याची माहिती मिळेल. गांडूळ खत  बनविने मार्गदर्शन, खवय्यांसाठी विदर्भ, कोकण,  मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागातील खाद्यपदार्थ खाण्यासाठी व विक्री साठी स्टाॅल  उपलब्ध असणार आहे. शेतकऱ्यांच्या मनोरंजनासाठी रोज सायंकाळी शाळा, महाविद्यालयतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत पारंपारीक लोकगीते, लोककला, नाटक, शास्त्रीय संगीत, शेतकरी गीते, लोकनृत्य यांचे सादरीकरण करण्यात येतील.  लाडक्या बहिणींसाठी

उद्धव के.पी‌. प्रस्तूत महाराष्ट्रभर गाजत असलेला महिला भगिनींचा एकमेव आवडता कार्यक्रम

खेळ पैठणीचा शुक्रवार दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी होत आहे. यासाठी रोख स्वरुपात बक्षीस रक्कम व मानाची पैठणी, याशिवाय इतर  भरपुर बक्षिसे जिंकण्याची व विविध खेळ खेळण्याची संधी आहे. गतवर्षी एकुण १०० स्टाॅल होते यावर्षी १५० स्टाॅल राहतील. शेतकऱ्यांच्या सोबत लहान मुले येतात त्यांच्या मनोरंजनाची सोय करण्यात आली आहे. गेल्या प्रदर्शनापेक्षा यावेळी मोठ्या प्रमाणात आर्थिक  उलाढाल होणार आहे.  कृषी प्रदर्शनाचा समारोप  अ. भा. वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले व गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत एक सप्टेंबर रोजी होणार आहे. हे प्रदर्शन संपूर्ण मोफत आहे, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे, स्वागतोत्सुक युवा नेते अजयदादा धोंडे, अभयराजे धोंडे, चेअरमन राजेश धोंडे,  कृषी महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. आरसुळ एस. आर., व्यवस्थापक  बंडु पाचपुते, गणेश जठार व कमिटीने केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here