मुंबई
beed gardian minister devendra fadanvis मंत्रीपदे आणि खाते यांच्यासाठी ज्याप्रमाणे रस्सीखेच सुरू होती, तशीच रस्सीखेच आता देखील पालकमंत्रिपदासाठी पाहायला मिळत आहे. 36 पैकी 11 जिल्ह्यात ही रस्सीखेच जरा जास्तच तीव्र असल्याचं दिसत आहे. पुणे, रायगड, नाशिक, संभाजीनगर, बीड, सातारा हे जिल्हे पालकमंत्रिपदासाठी प्रतिष्ठेचे बनले आहेत.
काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांनी दावा केल्याने याचे वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसरत होणार असल्याच्या चर्चा होत्या. आता तिन्ही पक्षातील मंत्र्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळवण्यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे.
जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याला पालकमंत्रिपद असा फॉर्म्युला ठरल्याच्या चर्चा सुरू आहेत, त्याबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरातील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, पालकमंत्र्याच्या संदर्भात आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील. ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल, त्यांनी मला बीडला जायला सांगितलं तर मी बीडला देखील जाईल, किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल. साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात. पण माझी स्वतःची इच्छा आहे, गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो, अर्थात या तीन नेत्यांनी मान्यता दिली तरच मी ते ठेवेन, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.