Sunday, April 27, 2025

बीड जिल्हयातुन 5608 प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतमध्ये निकाली

बीड

Beed lokadalat news महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरून व श्री. आनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. 22 मार्च 2025 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकून 5608 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत.

बीड जिल्हयातून न्यायालयातील प्रलंबीत प्रकरणांपैकी एकूण 11924 प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात, भुसंपादनाची प्रकरणे, 138 एन.आय.अॅक्टच्या प्रकरणांचा समावेश होता. त्यापैकी 693 प्रकरणे निकाली निघाली आहेत.

तर दाखलपुर्व प्रकरणामध्ये एकूण 44484 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 4915 प्रकरणे निकाली निघाली आहेत. असे एकूण 5608 प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये 17 कोटी 33 लाख 33 हजार 156 एवढ्या रकमेची प्रकरणे निकाली निघाली आहेत.


सदरील लोक न्यायालयाच्या प्रसंगी श्री. जी. जी. सोनी सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्यासह, श्री. व्ही.एच.पाटवदकर साहेब, जिल्हा न्यायाधीश -2, श्रीमती एस.आर.शिंदे जिल्हा न्यायाधीश 3. श्री. के. आर. जोगळेकर, जिल्हा न्यायाधीश 4 तसेच इतर पॅनल प्रमुख, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष श्री. आर.डी.येवले यांच्यासह वकील संघाचे सर्व पदाधिकारी जिल्हा सरकारी वकील व सर्व सरकारी अभियोक्ता यांची लोकन्यायालयात प्रमुख उपस्थिती होती.
न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, बॅंक कर्मचारी, पोलीस कर्मचारी व इतर कार्यालयीन कर्मचारी यांनी लोकअदालत यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles