Home प्रादेशिक बातमी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

0
50
Departing of Saint Shrestha Nivrittinath's Dindi to Pandharpur
Departing of Saint Shrestha Nivrittinath's Dindi to Pandharpur

नाशिक

Departing of Saint Shrestha Nivrittinath’s Dindi to Pandharpur त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पंढरपूर आषाढी वारीसाठी सुमारे साठ हजार वारकऱ्यांच्या सहभागासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या जयघोषात आज प्रस्थान झाले.

रथापुढे नाचणारे घोडे, सनई-चौघडा आणि सर्वात पुढे नगारा वाहन अशा थाटात व मृग नक्षत्राच्या शेवटच्या दिवशी पावसाची सलामी घेत आषाढी वारीसाठी संत निवृत्तीनाथांच्या रथाने पंढरपूरकडे प्रस्थान सुरू केले.

पंढरपूरच्या विठुरायाची आषाढी वारी सुरू झाली आहे. त्यात मानाच्या तिसऱ्या क्रमांकाची पालखी आद्यगुरू संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांची दिंडी असते. आज दुपारी भक्तिमय वारकऱ्यांच्या समवेत गुरुवारी (दि. २०) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संत श्री निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी संस्थान त्र्यंबकेश्वर येथून पालखीने प्रस्थान केले.

त्याआधीच आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वरला भेट देत संत निवृत्तीनाथांच्या समाधीचे तसेच सजविलेल्या पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनीही पालखीचे दर्शन दुपारी घेतले आणि त्यानंतर ही पालखी मार्गस्थ झाली. सायंकाळी पालखी गुरुगृही निवृत्तीनाथ महाराज यांचे गुरू गहिनीनाथ यांच्या समाधिस्थळी पंचायती महानिर्वाणी आखाडा, पेगलवाडी त्र्यंबकेश्वर येथे पहिल्या मुक्कामी विसावली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here