शिरूर,
Chain movement at Shirur to support Laxman Hake’s hunger strike ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावण्यात येवू नये या मागणीसाठी वडीगोद्री येथे आमरण उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिरूर येथील जिजामाता चौकात आजपासून साखळी आंदोलनाला सुरूवात करण्यात येणार आहे.
या संदर्भात 20 जून,गुरुवार रोजी सकाळी साडेनऊ वाजता शहरातील श्री क्षेत्र सिद्धेश्वर संस्थानच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला तालुक्यातील अठरापगड जातीच्या नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
ओबीसी समाजाचे आरक्षण वाचविण्यासाठी प्रा.लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासह मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येवू नये या आणि इतर मागण्यांसंदर्भात आजपासून साखळी आंदोलनाला सकाळी नऊ वाजता सुरुवात होणार आहे.या आंदोलनात तालुक्यातील अठरा पगड जातींच्या लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिरूर तालुका सकल ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.