Tuesday, July 23, 2024
spot_img

विमा भरण्यासाठी आगाऊ पैसे मागणाऱ्यांची कृषी हेल्पलाइन च्या व्हाट्सअपवर तक्रार करा

मुंबई

Report those who ask for advance money for payment of insurance on WhatsApp of Krishi Helpline प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी एक रुपयात पिक विमा भरणे चालू आहे, मात्र राज्यात काही ठिकाणी सीएससी केंद्र चालक हे शेतकऱ्यांकडून एक रुपयाच्या वर अवैधरित्या काही आगाऊ रक्कमा वसूल करत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या असून, आगाऊ पैसे वसूल करणाऱ्या केंद्र चालकांची पुराव्या सह तक्रार आल्यास आपण त्यांच्यावर कारवाई करणार असून अशा लोकांची अजिबात गय केली जाणार नाही, असा इशारा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

याबाबत धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना आगाऊ पैसे मागणाऱ्या सीएससी केंद्र चालकांची शक्य असेल त्या पुराव्यासह राज्य शासनाचा कृषी हेल्पलाइन व्हाट्सअप क्रमांक 9822446655 या क्रमांकावर व्हाट्सअप द्वारे थेट तक्रार करावी किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार द्यावी असे आवाहन केले आहे. सदर केंद्र चालकांवर ग्रामविकास विभागाच्या मदतीने कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा मुंडे यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांना पिक विम्याचा एक अर्ज भरण्यासाठी एक रुपया इतकीच रक्कम पोर्टलवर भरणे अपेक्षित आहे तर यासाठी संबंधित केंद्र चालकाला शासनाकडून प्रति विमा अर्ज 40 रुपये मानधन दिले जाते. मात्र काही केंद्र चालक सात-बारा ऑनलाइन काढणे, पेरणी प्रमाणपत्र यासारख्या बाबींच्या नावाने शेतकऱ्यांना आगाऊ पैसे मागत असल्याच्या तक्रारी येत आहेत, या विरोधात आता धनंजय मुंडे यांनी अधिक कडक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles