पुणे
दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर :महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात येत असलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र फेब्रुवारी मार्च 2026 या वर्षाच्या परीक्षा तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे नागपूर छत्रपती संभाजी नगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण यांना विभागीय मंडळामार्फत आगामी फेब्रुवारी मार्च 2026 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता बारावी आणि दहावीच्या परीक्षेच्या लेखी प्रात्यक्षिक व इतर परीक्षा यांचे तारखा मंडळींनी जाहीर केले आहे त्यानुसार इयत्ता दहावीची लेखी परीक्षा ही 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत आयोजित केली जाणार आहे.
इयत्ता बारावीची म्हणजेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा कालावधी हा 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे.
प्रात्यक्षिक लेखी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एन एस किंवा अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा या इयत्ता बारावीच्या 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीमध्ये आयोजित केल्या जाणार आहेत.
इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा या दोन फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2020 या कालावधीमध्ये आयोजित केल्या जाणार आहेत.
अशी माहिती राज्य मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे