Home क्राईम बातमी खुनाच्या गुन्ह्यात फरार आरोपी पोलिसांकडून गजाआड

खुनाच्या गुन्ह्यात फरार आरोपी पोलिसांकडून गजाआड

0
18

कडा,

Accused absconding in the crime of murder, arrested by the police खुनाच्या गुन्ह्यात हर्सुल कारागृहात शिक्षा भोगीत असलेला आरोपी अमीर भैया सय्यद रा. शिरापूर (ता.आष्टी) हा कोविडच्या काळात कारागृहातून रजेवर आल्यापासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता. अंभोरा पोलिसांनी त्यास मोठ्या शिताफीने सापळा लावून एका हाॅटेलमधून ताब्यात घेऊन गजाआड केले.

याबाबत अंभोरा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील शिरापूर येथील आरोपी अमीर भैया सय्यद हा खुनाच्या गुन्ह्यात छत्रपती संभाजीनगर येथे हर्सुल कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगीत होता. कोविडच्या कालावधीत तो कारागृहातून रजेवर आला. मात्र हजर न होता पोलिसांना गुंगारा देत अनेक वर्षे फरार झाला होता. या संदर्भात अंभोरा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दि.२० रोजी सपोनि मंगेश साळवे,पोलिस अंमलदार शिवदास केदार, सुदाम पोकळे, शरद पोकळे यांनी त्याच्या मागावर सापळा लावून मोठ्या शिताफीने एका हाॅटेलमधून ताब्यात घेऊन त्याला गजाआड केले. बुधवारी न्यायालयात हजर करुन त्यास कारागृहात जमा करणेबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे अंभोरा पोलिसांकडून सांगण्यात आले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here