Home क्राईम बातमी नराधमांना कठोर शिक्षा करण्याची शिवसेनेकडून मागणी

नराधमांना कठोर शिक्षा करण्याची शिवसेनेकडून मागणी

0
16

कडा
Ashti news येथे शाळेत दोन चिमुरड्या मुलीवर झालेल्या लैगिक अत्याचाराच्या निषेधार्थ शिवसेना (उबाठा) च्या वतीने आष्टीत तहसीलदार बाळदत्त मोरे यांना निवेदन देऊन या घटनेतील अत्याचारी नराधमांना कठोर शिक्षा करण्याची शिवसेनेकडून मागणी करण्यात आली.


आष्टी येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून बदलापूर येथील शाळेत चिमुकलीवर झालेल्या अमानवी अत्याचाराचा निषेध करुन तहसीलदाांना निवेदन देऊन नराधमाला फाशी देण्याची मागणी करण्यात आली. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात अपयशी ठरलेल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा द्यावा. अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली.

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष राऊत, उपतालुकाप्रमुख अक्षय साप्ते, संघटक ज्ञानदेव मुटकुळे, सोमनाथ खिळे, विद्यार्थी सेनेचे शिवप्रसाद जाधव, बापुराव काळे, साईनाथ पाखरे, रामदास मोहिते, शिवाजी थोरवे,अब्रान शेख इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here