नांदुरघाट ग्रामीण रुग्णालयासह आष्टी रुग्णालयाला शासनाचा कायाकल्प पुरस्कार  

0
20
kayakalp purskar nandurghat ashti dhanora
kayakalp purskar nandurghat ashti dhanora

सलग तिसर्‍या वर्षी नांदुरघाट ग्रामीण रुग्णालयाला शासनाचा  कायाकल्प पुरस्कार
बीड,

kayakalp purskar nandurghat ashti dhanora बीड जिल्ह्यातील व केज तालुक्यातील नांदुरघाट  ग्रामीण रुग्णालयाने केंद्र व राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा मानाचा कायाकल्प पुरस्कार पटकाविला असून सदरील पुरस्कार हा केंद्रशासन व राज्य शासनाच्या वतीने स्पर्धेतून शासकिय रुग्णालयांच्या आरोग्य सुविधांचा दर्जा वाढावा व नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात या हेतूने उत्कृष्ट कार्य करणार्‍या आरोग्य संस्थाना (रुग्णालयांना) दर वर्षी दिला जातो.

2022-23 या वर्षीचा पुरस्कार ग्रामीण रुग्णालय नांदुरघाट ग्रामीण रुग्णालय यांना मिळाल्याची घोषणा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

 

लोकसभेविषयी 29 मार्चला घेणार निर्णय- डॉ. ज्योती मेटे

सदरील कायाकल्प पुरस्कारासाठी संपुर्ण महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यातील सर्व संस्थांनी (रुग्णालयांनी) या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये नांदुरघाट ग्रामीण रुग्णालय, धानोरा ग्रामीण रुग्णालय आणि आष्टी ग्रामीण रुग्णालय यांना हा पुरस्कार प्राप्त झाला. नांदुरघाट ग्रामीण रुग्णालयने सलग तिसर्‍या वर्षी हा पुरस्कार पटकाविला असून यासाठी बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बडे यांचे नांदूरघाट ग्रामीण रुग्णालयाला नेहमी मार्गदर्शन लाभले.

त्यांनी अनेकवेळा या रुग्णालयांना भेटी देवून मार्गदर्शन केले असून नांदूरघाट ग्रामीण येथील सर्व कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, डॉ.अश्विनी नागरगोजे यांनी आमुलाग्र बदल घडवून आणून नांदुरघाट गामीण रुग्णालयाचे कार्यालयाचे काम केले आहे. तसेच या रुग्णालयातील नर्सिंग ऑफिसर रंजना चव्हाण,  नंदिनी होळकर, सविता हांगे, प्रशांत खेडकर, राम जाधव, श्रीकृष्ण घोडके यांनी योगदान दिले असून साफसफाई कर्मचारी गणेश गंभीरे, जफर सय्यद, प्रल्हाद गरकळ आणि इतर सर्व कर्मचारी पवार, सलमान इनामदार, भारत जाधव, देवेंद्र जाधव यांनी योगदान दिले हा पुरस्कार मिळाल्यामुळे सर्वांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here