Thursday, October 31, 2024

अमली पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी व कुटुंबासाठी घातक- रवींद्र शिंदे

बीड (प्रतिनिधी )

World Anti-Drug Abuse Day समाज कल्याण अधिकारी कार्यालय जि प बीड ,राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान वासनवाडी ता.जी. बीड ,व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त अंथरवन  पिंपरी तांडा वस्ती  येथील आश्रम शाळेमध्ये जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र शिंदे समाज कल्याण अधिकारी जि. प. बीड ,अशोक तांगडे, अध्यक्ष बालकल्याण समिती बीड ,तत्त्वशील कांबळे सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा संघटक नशाबंदी मंडळ बीड, मिथुन जोगदंड ,आश्रम शाळेचे मुख्याध्यापक डी.ए .शिंदे, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एम. आर.खंदारे शाळेचे शिक्षक व  कर्मचारी वृंद   विचार मंचावर उपस्थित होते.

सर्वप्रथम राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि प बीड रवींद्र शिंदे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, अमली पदार्थांचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी व कुटुंबासाठी घातक आहे. यामुळे वेगवेगळे आजार आपणास जडत आहेत. व्यसनामुळे कुटुंबाचा ऱ्हास होत आहे.  आपण कमावलेल्या पैशाचा ही त्यातून नाश होतो.

अंमली पदार्थांच्या सेवनामुळे युवकांची दिशा बदलत आहे अंमली पदार्थ सेवनाची एकदा सवय लागल्यानंतर ती लवकर सुटत नाही. त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे युवकांनी व किशोरवयीन बालकांनी या सर्व गोष्टी पासून दूर राहावे. आपले शरीर निरोगी ठेवावे. असे विचार रविंद्र शिंदे यांनी व्यक्त केले

कार्यक्रमात तत्त्वशील कांबळे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, अंमली पदार्थ ही आता खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे महानगर असो किंवा ग्रामीण भागात अमली पदार्थांच्या व्यसनांचे पदार्थ पोहोचलेले आहेत. या अशा प्रकारच्या नशा मुळे युवकांचे मनोधैर्य खचत असून ते व्यसनाच्या विळख्यात अडकून स्वतःची जीवन बरबाद करत आहेत.

त्यामुळे हे व्यसन आपल्याला लागू नये याकरिता आपण आपल्या जीवनात चांगले मित्र मैत्रिणी कराव्या जे व्यसना पासून लांब आहेत. अशांसोबत राहावे. कुणी कितीही बळजबरी केली तरी व्यसनाच्या आहारी जाऊ नये. एकदा जर अमली पदार्थ व्यसनाची चटक लागली तर संपूर्ण आयुष्य बरबाद होते. त्यामुळे अंमली पदार्थांच्या व्यसनापासून आपण दुर राहीले पाहीजे, असे आवाहन कांबळे यांनी केले. 

बाल कल्याण समिती अध्यक्ष अशोक तांगडे यांनी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त छत्रपती शाहू महाराज यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला. 

शाहू महाराजांनी, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले. अस्पृश्यता विरोधी कायदा केला, शिक्षण हक्क कायदा तयार केला. स्वस्त धान्य दुकानांची निर्मिती केली.  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणात मदत केली. तसेच अस्पृश्य जातींना आपल्या राज्यात पन्नास टक्के नोकरीत आरक्षण दिले. म्हणून छत्रपती शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक म्हणतात. या छत्रपती शाहू महाराजांची आठवण ठेवून त्यांच्या विचारांप्रमाणे वर्तन करण्याचे आवाहन अशोक तांगडे यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  शिंदे व्ही. एन .यांनी तर  आभार प्रदर्शन केशव जवरे यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles