शिर्डीतुन महाविकास आघाडीतर्फे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा रिंगणात;महायुतीच्या उमेदवारीची उत्सुकता

0
5
Shirdi loksabha election shivsena UBT candidate bhausaheb wakchaure
Shirdi loksabha election shivsena UBT candidate bhausaheb wakchaure

शिर्डीतुन महाविकास आघाडीतर्फे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा रिंगणात;महायुतीच्या उमेदवारीची उत्सुकता

शिर्डी,

Shirdi loksabha election shivsena UBT candidate bhausaheb wakchaure आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अखेर महाआघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार म्हणुन माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र बऱ्याच दिवसांपासून महायुतीच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटला नसल्याने उमेदवारी कोणाला मिळते याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 16 जागांची यादी जाहीर

दरम्यान येथुन शिवसेनेचे शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे महायुतीचे प्रबळ दावेदार मानले जातात.ते गेल्या काही दिवसांपासून आपल्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असुन ते मुंबईत तळ ठोकून आहेत.

या मतदार संघाची निवडणुक पाचव्या टप्प्यात दि.१३ मे रोजी होत आहे. महाआघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी भाजप – सेना युतीकडून २००९ मध्ये शिर्डी मतदार संघातून रामदास आठवले यांच्या विरोधात निवडणुक लढवून सुमारे सव्वा लाखांच्या फरकाने काँग्रेसच्या छुप्या पाठिंब्याने जिंकली होती.

मात्र वाकचौरे यांनी २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीतुन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली २०१४ आणि २०१९ मध्ये लाखांच्या वर फरकाने दोनदा निवडणूक जिंकली होती. यंदाही लोखंडेंचे नाव आघाडीवर आहे. मात्र अद्याप त्यांची उमेदवारी अधिकृत जाहीर झालेली नाही. एक दोन दिवसांत महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्यावर शिर्डीतील चित्र स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here