विड्या’तील वर्षीचा ‘गदर्भ स्वारी’चा मानकरी संतोष जाधव

0
20
vida gadarbh swari santosh jadhav
vida gadarbh swari santosh jadhav
विड्या’तील वर्षीचा ‘गदर्भ स्वारी’चा मानकरी संतोष जाधव
तीन जावई शोधले दोन गेले पळून
दीपक नाईकवाडे,
vida gadarbh swari santosh jadhav  केज तालुक्यातील विडा येथे जावयाला  गाढवावरून धुलीवंदनाच्या दिवशी मिरवणूक काढण्याची परंपरा आहे.मात्र जावई शोध घेण्यासाठी सर्वात जास्त परिश्रम मागील दोन दिवसात घ्यावे  लागले.
जावई शोध घेण्यासाठी विड्याच्या समाज माध्यमातून अशी एक खोटी पोस्ट शेअर करण्यात आली की जावई शोधला. ही पोस्ट गावोगावी पसरली त्यामुळे परिसरातील सर्वच जावयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
ही पोस्ट बघून बुरंडवाडी येथील जावई यांनी हे विडा येथील हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी आले .मग काय सर्व टीम ने त्यांना पकडून ग्रामपंचायत मध्ये सर्वाच्या नजर कैदेत ठेवण्यात आले .पण चारच्या सुमारास अशोक भोसले यांनी असे सांगितले की मला घरीहून फोन आला महत्वाचे काम आहे, मी परत येतो त्यांनी तरी देखील जाऊ दिले नाही मग नंतर सर्वांची नजर चुकवून ते पळून गेले.
त्यांचा पाठलाग करून शोधण्याचा प्रयत्न केला मात्र ते पळून जाण्यात यशस्वी ठरले,मग नंतर पुन्हा जावई शोधण्यासाठी मोठे आव्हान त्यानंतर शिंदी येथून फोन आला एक टीम तयार केली आणि शिंदी ला सर्वजण गेले आणि तेथून संतोष जाधव यांना पकडून आणले.
 त्यांना विड्यात संध्याकाळी 6 च्या सुमारास ग्रामपंचायत मध्ये आणून ठेवले त्यानंतर ते देखील रविवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास सर्व झोपेत असताना पलायन केलं त्यानंतर पूर्ण टीम त्यांच्या शोधत राहिली पण ते देखील सापडले नाही.
सोमवारी सकाळी साडेपाच वा पुन्हा एक टीम तयार करून केजला निघाली त्याठिकाणी वकिली करत असणारे एन,आर शिंदे यांना त्यांच्या राहत्या घरीहून पकडून आणले मात्र तो देखील डाव फसला कारण त्यांची मुलीने गाडीला आडवे जाऊन टीमला चांगले सुनावले व सांगतले की माझ्या वडिलांना जर हात लावला तर खबरदार त्यामुळे केजहून देखील रिकाम्या हाताने सर्व टीम विड्याकडे रवाना  होत असताना, शिंदीहुन एक फोन आला आणि सांगण्यात आले की विड्याचे जावई संतोष जाधव हे चिंचेच्या झाडावर लपले आहेत.
 लवकर या मग गाडी शिंदीच्या दिशेनं काढली मग पळून गेलेले जावई चिंचेच्या झाडावर लपून बसले होते त्यांना खाली उतरहून गदर्भ सवरीसाठी विड्यात सकाळी आठ वाजता आणले,व नंतर गाढवाच्या गळ्यात चप्पल व बुटाचे हार घालून जावयाला सजवलेल्या गाढवावर बसून गावभर डॉल्बीच्या व ढोल ताश्याच्या तलावावर मिरवणूक काढण्यात आली.
त्यानंतर गावभर जावयाची बेइज्जत करून त्यांना इज्जत देण्यात आली. मिरवणूक मारुतीच्या पारावर विसर्जित करून जावयाला गावकऱ्यांच्या वतीने फुल कपडे आहेर व सासरे एकनाथ पवार यांच्याकडू पाच ग्राम सोन्याची अंगठी  घालून असा मान करण्यात आला. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सरपंच सुरज पटाईत,उपसरपंच सदाशिव वाघमारे,गोविंदा देशमुख, राजेभाऊ घोरपडे, महादेव पटाईत,शाहाजी घुटे, यांनी मोठे परिश्रम घेतले असू  हा कार्यक्रम पहाण्यासाठी लहान थोर व जिल्ह्यातील लोकांनी हजेरी लावली.
,
माझी गाढवावर बसण्याची मुळीच इच्छा न्हवती म्हणून मी रविवारी मध्यरात्री विड्यातून पाळून शिंदीला आलो होतो मात्र मला चिंचेच्या झाडावर लपून बसल्याची खबर मिळाली आणि बळीचा बकरा झालो मानकरी जावई संतोष जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here