Homeप्रादेशिक बातमीRohit pawar andolan 29 june कर्जमाफी फसवी; २९ जून ला छत्रपती संभाजीनगर...

Rohit pawar andolan 29 june कर्जमाफी फसवी; २९ जून ला छत्रपती संभाजीनगर येथे करणार निषेध आंदोलन

बीड,

Rohit pawar andolan 29 june शेतकऱ्यांना देण्यात येणारी कर्जमाफी ही फसवी आहे, कर्जमाफी मधील अटी व शर्ती काढून टाकावी अशी मागणीसाठी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन केले होते.

या आंदोलनाला भेट देऊन सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी अटी व शर्ती काढून टाकण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अटी व शर्ती शिवाय कर्जमाफीचे आश्वासन देऊन योग्य कर्जमाफी देण्यास टाळाटाळ करून राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्या सरकारला जाब विचारण्याची वेळ आता आली आहे.

त्यामुळे सदरील कर्जमाफी ही फसवी असून येथे २९ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे निषेध आंदोलन करणार आहे अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी बीड येथे पत्रकार परिषदेमध्ये दिली.

यावेळी आमदार संदीप क्षीरसागर माजी आमदार सय्यद सलीम पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments