नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असणार -अमोल गाडे

अहिल्यानगर

शहरी भागातील दररोज नवनवीन समस्यांना सामोरे जावे लागते.या भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महापौर यांच्यासह नगरसेवक कटिबद्ध असल्याचे महापौर ज्योती गाडे यांचे प्रतिनिधी अमोल गाडे यांनी सांगितले.


शहरातील पाईप लाईन रस्त्यावरील आनंदबन कॉलनी मध्ये आयोजित छोटेखानी सत्कार कार्यक्रमात बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल मुरकुटे हे होते.यावेळी व्यासपीठावर नगरसेवक अजिंक्य बोरकर, करण कराळे, ऋग्वेद गंधे,उपस्थित होते.

यापुर्वी सर्व नगरसेवक यांनी पाइप लाईन रस्त्यावर सुरू असलेल्या गटार दुरुस्ती कामाची पाहणी केली.त्यांनी संबधित कंत्राटदाराला सूचना दिल्या.
यावेळी बोलताना महापौर पति अमोल गाडे यांनी सांगितले की, आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा विकास होत आहे.छोट्या कॉलनीत विकास कामे होत आहेत. नागरिकांना येत असलेल्या समस्या त्यांनी पुढे येऊन सांगाव्यात. तसेच सुचना करण्यात.


यावेळी बोलताना नगरसेवक अजिंक्य बोरकर सांगितले की, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही 24 तास उपलब्ध आहोत. नागरिकांनी आपल्या अडचणी सोबत सुचना ही करण्याची विनंती केली.


यावेळी करण कराळे,ऋग्वेद गंधे यांनी आपले विचार व्यक्त केले.यावेळी नगरसेवक अणि नागरिकांमध्ये चर्चा झाली.यावेळी सच्चिदानंद पवार,कोल्हे, आर्किटेक्ट इंजीनियर साळुंखे, गोखले, श्रीकांत पुंडे, आर्की . उदयन पवार, संजय कोल्हे, शहाणे साहेब रोहीत कोडम, मेमाने, शेख साहेब उपस्थित होते कॉलनीतील महिलांचा उस्फूर्तसहभाग होता. महिलांनीआपल्या समस्या यावेळी मांडल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज सातपुते यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles